आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

51 दात्यांचे रक्तदान:सामाजिक बांधिलकीच्या नात्याने रक्तदानाचा वसा प्रत्येकाने जपावा; मुक्ताईनगरात शिबिरावेळी अॅड.रोहिणी खडसेंचे मत

मुक्ताईनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जी.जी.खडसे महाविद्यालयातील रासेयो विभागाने व जळगाव येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेतले. त्यात ५१ दात्यांनी रक्तदान केले. माजी मंत्री तथा विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला.शिबिराचे उद्घाटन मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एच.ए.महाजन होते. अॅड.खडसेंनी रक्तदान हे जीवनदान समजले जाते. त्यामुळे सामाजिक बांधिलकी या नात्याने आपण सर्व जण रक्तदानाचा वसा घेऊ असे आवाहन केले.

प्राचार्य महाजन यांनी अपघात किंवा आपत्कालीन स्थितीत रुग्णांवर उपचारासाठी रक्ताची कमतरता भासते. त्यामुळे ठिकठिकाणी रक्तदान शिबिरांची आवश्यकता असल्याचे सांगितले. रेड क्रॉस सोसायटी पदाधिकाऱ्यांसह मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष नारायण चौधरी, सचिव डॉ.सी.एस.चौधरी, उपप्राचार्य डॉ.अनिल पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.संजीव साळवे, ग्रंथालय अधीक्षक प्रा. सरोदे, रासेयोच्या महिला अधिकारी प्रा.डॉ. ताहिरा मीर यांनी सहकार्य केले.या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी पांडुरंग नाफडे, जितेंद्र पाटील, प्रदीप साळुंखे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. विजय डांगे, तर आभार एनएसएस सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.दीपक बावस्कर यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...