आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुक:कुणी वॅगनमध्ये धूर दिसताच मालगाडी थांबली, तर कुणी ट्रॅक नादुरुस्त दिसताच

भुसावळ8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्तव्यावर सतर्कता बाळगून रेल्वे गाडीचा संभाव्य अपघात टाळणाऱ्या १४ कर्मचाऱ्यांचा मुंबई येथे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांच्या हस्ते ‘महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार’ देऊन गौरव झाला. त्यात भुसावळ विभागातील ३, मुंबई ५, नागपूर ३, पुणे १ आणि सोलापूर विभागातील २ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे १ ऑगस्टला हा कार्यक्रम झाला. त्यात जुलै महिन्यात कर्तव्यादरम्यान सतर्कता, अनुचित घटना टाळणे आणि रेल्वे दळणवळणात सुरक्षितता सुनिश्चित करण्यात कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानाचा पुरस्काराने गौरव झाला. पदक, प्रमाणपत्र आणि दाेन हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखवलेली ही सतर्कता इतरांना प्रेरणा देईल असे जीएम लाहोटी म्हणाले. अतिरिक्त महाव्यवस्थापक आलोक सिंग, प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी डी.वाय.नाईक, प्रधान मुख्य अभियंता राजेश अरोरा, अजय सदनी, मुकुल जैन उपस्थित होते.

म्हणून मालगाडीचा अपघात टळला : महाजन
एन.ए.महाजन हे हिरापूर (ता.चाळीसगाव) रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर होते. स्थानकातून जाणाऱ्या मालगाडीच्या वॅगनमधून धूर निघताना दिसताच त्यांनी रेड सिग्नल दाखवून गाडी थांबवली. वरिष्ठांना माहिती दिली. यामुळे संभाव्य अपघात टळला.

वेल्ड फ्रॅक्चर दिसले : नीरज कुमार
पाचाेरा येथील ट्रॅक मेंटेनर नीरज कुमार हे कर्तव्यावर होते. माहेजी आणि परधाडे दरम्यान ट्रॅकवर वेल्ड फ्रॅक्चर दिसले. त्यामुळे नीरज कुमार यांनी वरिष्ठ अधिकारी व सहकाऱ्यांना माहिती दिली. वेळीच उपाययोजना झाल्याने अपघात व दळणवळणातील व्यत्यय टळला.

इमर्जन्सी ब्रेक लावला : पाटील
लाेकाे पायलट जे.एस.पाटील यांनी डोंगरगड स्थानकाजवळ मालगाडीचा वेग नियंत्रित करण्यासाठी दबाव टाकला. त्याचा उपयोग न झाल्याने वेळेचे गांभीर्य ओळखून त्यांनी गार्डला गार्डला संपर्क करून आपत्कालिन ब्रेक लावण्यास सांगितले. यामुळे संभाव्य अपघात टळल्याचे त्यांनी पाटील म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...