आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमाई घरकुल:राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कान पिळताच रमाई घरकुलांसाठी हालचाली ; अधिकाऱ्यांना धारेवर धरले

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जलसंपदा व लाभक्षेत्र विकास तथा शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी २७ मे रोजी शहरातील प्रांत कार्यालयात आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत पालिकेच्या माध्यमातून रमाई घरकुल योजनेसाठी अंमलबजावणी न झाल्याने पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार व अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. यानंतर पालिकेने नगरपालिका क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नागरिकांना योजनेचा लाभ देण्यासाठी प्रक्रिया सुरु केली आहे. पालिका क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे रमाई आवास योजना राबवण्यात येते. या योजनेंतर्गत एसईसीसी २०११ च्या प्राधान्यक्रम यादीच्या निकषा बाहेरील व रुपये ३ लाख उत्पन्न मर्यादा असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थींची निवड केली जाणार आहे. पालिकेने अशा घटकातील पात्र लाभार्थींकडून अर्ज मागवले आहे. तसेच योजनेत सहभागासाठी स्वतंत्र नियोजन केले आहे. या योजनेतून आलेल्या प्रस्तावातील लाभार्थींना घरकुलाचा लाभ देण्यात येईल. यामुळे रेल्वे अतिक्रमण निर्मूलनात बेघर झालेले व वर्षानुवर्षे भाड्याच्या घरात राहणाऱ्या पात्र नागरिकांना हक्काचा निवारा मिळू शकेल.

बातम्या आणखी आहेत...