आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबाबदार प्रशासनाचे दुर्लक्ष:राखेच्या बल्करमुळे दीपनगरजवळ महामार्गावर माेठ्या अपघाताचा धोका; अवजड वाहतूकदारांकडून हाेतेय मुजोरी

भुसावळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राच्या ५०० बाय २ व ६६० मेगावॅट प्रकल्पाच्या प्रवेशद्वारासमोर महामार्गावरील सर्व्हिस रोडवर राखेचे बल्कर पार्किंग केले जातात. यामुळे महामार्गावर मोठा अपघात होण्याची भीती आहे. केंद्रातील जबाबदार अधिकारी मात्र याकडे दूर्लक्ष करतात. तालुका पोलिस देखील कारवाई करत नाही.दीपनगर केंद्रातून वीज निर्मितीनंतर निघणारी दररोजची हजारो टन फ्लाय अॅश अनेक व्यवसायांसाठी बल्करद्वारे वाहून नेली जाते.

दीपनगर केंद्रात बल्कर पार्किंगची सुविधा असताना वाहतूकदार महामार्गावरील सर्व्हिस रोडवर बल्कर उभे करतात. यामुळे अपघात होण्याचाही धोका आहे. या प्रकरणी तालुका पोलिस, महामार्ग पोलिस, आरटीओ कारवाई होत नाही. दीपनगर केंद्रातून फ्लॉय अॅशने भरुन आणल्यावर बल्कर बाहेर नेऊन रिफिलिंग केले जाते. यामुळे १० टन क्षमतेच्या बल्करमधून तब्बल २८ ते ३० टन राखेची वाहतूक होते.

बॉटम अॅश वाहतूक नियमबाह्य
वेल्हाळे परिसरातील ट्रक व टॅक्टरद्वारे बॉटम अॅश वाहतूक केली जाते. बंदिस्त पद्धतीने राख वाहतुकीचे नियम पाळले जात नाही. उघड्या वाहनातून हवेमुळे राख इतरत्र उडते. ही राख मागील बाजूच्या वाहन चालकांचे डोळे, नाका-तोंडात उडते.

बातम्या आणखी आहेत...