आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासाची धोरणे:एक कोटीच्या निधीतून खडकारोडचे डांबरीकरण; अखेर डोकेदुखी संपणार

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील खडका रोडवरील सुभाष पोलिस चौकी ते महामार्गावरील खडका चौफुलीपर्यंत रस्ता डांबरीकरण सुरु आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणार असल्याने या भागातील रहिवाशांना दिलासा मिळेल. एक कोटी रुपये खर्चाचे हे काम आहे.

शहरातील खडकारोडची दुरवस्था झाली होती. यामुळे दुरुस्तीची मागणी असली तरी प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या पाच वर्षांपासून या रस्त्याचे काम न झाल्याने जागोजागी खड्डे पडले होते. पालिकेने गेल्या काळात आपल्या फंडातून १ कोटी रुपये निधीतून या रस्त्याच्या डांबरीकरणाचे नियोजन केले होते. मात्र, त्याला विलंब झाला. अखेर पालिकेवरील प्रशासकीय राजवट काळात या कामाची निविदा पूर्ण होऊन कामाला सुरुवात झाली.

बातम्या आणखी आहेत...