आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकार परिषद:रेल्वेकडून आश्वासन; सीआरएमएसचे आंदोलन मागे

भुसावळ20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सीआरएमएसतर्फे सुरू झालेले बेमुदत आंदोलन मंगळवारी रेल्वे प्रशासनासोबत पदाधिकाऱ्यांच्या सकारात्मक चर्चेअंती सीआरएमच्या पदाधिकाऱ्यांनी मागे घेतले. रेल्वे प्रशासनाने दिलेला शब्द पाळावा, अशी भूमिका घेतल्याची माहिती पत्रकार परिषदेत मंडळ अध्यक्ष व्ही.के. समाधिया, एस.बी. पाटील यांनी दिली.

तिकीट चेकिंग स्टाफला रोटेशनमध्ये भेदभाव दूर करून सर्वांना न्याय द्यावा, एसपीएडी केसेसमध्ये रेल्वे सेवेतून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरीत घ्यावे, कर्मचाऱ्यांचा थांबवलेला टीए तत्काळ द्यावा, तिकीट चेकिंग स्टाफला अमेनिटीमध्ये रेल्वे बोर्डच्या नियमानुसार डबे वाटप करावेत, तिकीट चेकिंग स्टाफला पॅनल त्वरित जारी करण्यात यावे, सर्व विभागातील रिक्त पदे भरावीत, खराब रस्ते, निवासस्थाने दुरुस्त करावीत, सहा ट्रॅक मेंटेनन्स कर्मचाऱ्यांना सी अ‍ॅण्ड डब्ल्यू मध्ये सोडावे, टीटीई लॉबीमध्ये सुविधा द्याव्यात, भुसावळ बुकिंग ऑफिसमध्ये थंड पाण्याचा कुलर लावावा आदी मागण्यांसाठी डीआरएम कार्यालयाबाहेर शुक्रवारपासून हे आंदोलन छेडले होते. मंगळवारी सकाळी एडीआरएम रुकवैय्या मीना व वरिष्ठ कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांनी आंदोलकांची भेट घेत मागण्यांबाबत आश्वासन दिले.

विविध मागण्यांसाठी आज मोर्चा
मनमानी पद्धतीने पदांचे आत्मसमर्पण थांबवावे, गैर सुरक्षा श्रेणीतील ५० टक्के रिक्त जागा आत्मसमर्पित करण्याचा आदेश तत्काळ मागे घ्यावा, दरवर्षी दोन टक्के पद आत्मसमर्पण करण्याचा आदेश मागे घ्यावा, एनपीएस बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, नाईट ड्युटी कमाल भत्त्याची मर्यादा तत्काळ हटवावी आदी मागण्यांसाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघ (सीआरएमएस) तर्फे बुधवारी सायंकाळी पाच वाजता रेल्वे मैदान ते डीआरएम कार्यालयादरम्यान मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन सीआरएमएसतर्फे करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...