आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:चितोडा येथे तिघांनी मध्यरात्री लांबवले दुकानाबाहेरून वाहन

यावलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील चितोडा येथे दुकानाबाहेर लावलेले छोटा हाती वाहन एका भामट्यांनी मध्यरात्रीनंतर लांबवले. प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झाला. याप्रकरणी यावल पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.चितोडा येथील सातपुडा कृषी केंद्राबाहेर प्रशांत निवृत्ती धांडे यांच्या मालकीचे छोटा हाती वाहन (क्रमांक एमएच.१९-एस.९७७५) उभे केले होते. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात भामटे वाहनाजवळ आले. त्यातील एकाने बनावट चावीने दरवाजा उघडून आत प्रवेश केला. नंतर वाहन घेऊन पसार झाले.

हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला. दरम्यान, एका दुचाकीवर तीन जण चितोडा गावात आल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. त्यांनी अंधारात दुचाकी लावली. एक जण दुचाकीवर होता, तर दोघे छोटा हत्तीजवळ आले. दोन वाहनात व एक दुचाकीवर झाला पसार झाला. दरम्यान, चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत पाहताना मध्यरात्री २.३० मिनिटांनी चोरटा आला व त्याने वाहनाचा दरवाजा उघडला. यानंतर वाहन चितोडा येथून यावलमार्गे चोपड्याच्या दिशेने निघाल्याचे दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...