आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील मिरवणूक मार्गावर केवळ अर्धा किमी अंतरात पाच ठिकाणी वीज वाहिन्या जमिनीपासून केवळ २० फूट उंचीवर लोंबकळल्या आहेत. यामुळे २० फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्ती वाहनावर ठेऊन विसर्जनासाठी नेताना अडथळे येऊ शकतात. यामुळे अपघात देखील होऊ शकतो. महावितरणकडून नियोजित भूमिगत वीज वाहिनीचे काम अर्धवट असल्याने ही समस्या जटील झाली आहे.
भुसावळ शहरात बाजारपेठ आणि शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १६५ सार्वजनिक गणेश मंडळातर्फे श्रींची स्थापना केली जाते. यापैकी सुमारे ३० मंडळे सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. यापैकी बहुतांश मंडळांच्या गणेशमूर्तींची उंची २० फुटांपेक्षा जास्त असते. हजारो गणेशभक्तांचा सहभाग असलेल्या मिरवणुकीतून अवजड वाहनावरील ही भलीमोठी मूर्ती तापी नदीकडे नेताना काळजी घ्यावी लागते.
जीर्ण जलवाहिनीने खोदकामात अडसर
विसर्जन मिरवणूक मार्गावर वीज कंपनीने भूमिगत वीज वाहिनीचे काम हाती घेतले होते. मात्र, ब्राह्मण संघ ते गणेश मॉलपर्यंत भूमिगत वायर टाकली गेली. त्यापुढील सराफ बाजारातील रस्ते काँक्रीटचे आहेत. शिवाय त्या खालील पाइपलाइन जीर्ण झाली आहे. भूमिगत वीज वाहिनीचे काम करताना रस्ते खोदावे लागतील. त्यात पाइपलाइन फुटल्यास पाणीपुरवठा ठप्प होऊ शकतो. त्यामुळे हे काम रखडले.स
पोलची उंची वाढवल्यास सुटेल समस्या
यंदा मूर्तीच्या उंचीवर कोणतेही निर्बंध नाहीत. यामुळे शहरातील अनेक मंडळांनी १५ ते २० फूट उंचीच्या मूर्ती बुकिंग करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे यंदा लोंबकळलेल्या विजतारांचा प्रश्न अधीक गंभीर होईल. या ठिकाणी वीज खांबांची उंची वाढवणे, भूमिगत विजवाहिनी टाकणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जोडणाऱ्या केबल एकाच बाजूने टाकणे, शक्य तेथे एरियल बंच केबल टाकल्या पाहिजे.
हे भाग ठरतात अडचणीचे
विसर्जन मिरवणूक मार्गावर नृसिंह मंदिरासमोर, तेथून अवघ्या १०० फूट अंतरावर जवाहर डेअरी, गणेश मॉलसमाेर मरिमाता मंदिराजवळ सर्व्हिस वायर खाली आली आहे. माेठ्या मशीद चौकात प्रवेश करतानाच वीज तार लोंबकळल्याचे दिसते. सराफ बाजारात केबल व टेलिफोन विभागाच्या वायरिंग लटकल्या आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.