आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील दहिगाव येथील प्रमुख चौकात असलेले स्टेट बँकेचे एटीएम बुधवारी मध्यरात्री फोडण्याचा प्रयत्न झाला. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधाराने एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
गावातील स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल पोलिस पाटील संतोष जीवराम पाटील, सरपंच अजय अडकमोल यांनी यावल पोलिसांना माहिती दिली. यानंतर फैजपूरचे डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, उपनिरीक्षक सुदाम काकडे यांनी घटनास्थळी पाहणी केली. यानंतर ग्रामपंचायतीने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. त्यात संशयित वाटलेल्या एका जणाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, एटीएममधील रोकड सुरक्षित आहे. मात्र, एटीएमचा पत्रा तोडून लॉक व पैसे काढण्याचा पट्टा तोडल्याने मशीनचे सुमारे ७० हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे बँकेने सांगितले. फौजदार सुदाम काकडे, सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण यांनी पंचनामा केला.
चोरट्यांचा माग काढण्यासाठी जळगाव येथून श्वान पथक बोलावण्यात आले. मात्र, एटीएमवर सकाळपासून अनेकजण येऊन गेल्याने या श्वान पथकाकडून तपासणी झाली नाही. ठसे तज्ज्ञांनी मात्र नमुने घेतले आहे. या प्रकरणी स्टेट बँकेचे दीपक दौलत तिवारी यांनी पोलिसांत तक्रार दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.