आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील जामनेरराेडवरील नवशक्ती आॅर्केडमधील इंडियन आेव्हरसीस बॅँकेच्या एटीएममधील बॅटऱ्या चाेरट्याने लंपास केल्याचे फेब्रुवारीत उघड झाले. होते. याप्रकरणी महिनाभरानंतर २ मार्चला चाेरीचा गुन्हा दाखल झाला. सुदैवाने एटीएममध्ये राेकड नव्हती. जानेवारीपासून हे एटीएम बंद होते, तर फेब्रुवारीत चोरीचा प्रकार समोर आला होता.
या एटीएमचे कार्डरिडर जानेवारीत नादुरुस्त झाल्याने एटीएम बंद हाेते. त्यामुळे बँकेने एटीएममधील पाच लाखांची कॅश काढून घेतली होती. बँक व्यवस्थापक रश्मीकुमार चंद्रभान सिंह, या तपासणीसाठी फेब्रुवारीत आल्या. त्यावेळी एटीएम कार्डरिडरची तुटफूट झाल्याचे व बॅटरी चोरीला गेल्याचे समोर आले. डीवायएसपी साेमनाथ वाघचाैरे, पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी घटनास्थळी पाहणी करत तपासाला गती दिली.
सीसीटिव्ही फुटेज ताब्यात
या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. चाेरट्यांनी १२ हजार रूपयांच्या तीन बॅटरी व ५ हजार रूपयांचे माॅनीटर असा १७ हजार रूपयांचा मुद्देमाल लांबवला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.