आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:अट्रावलला आढळला 80 वर्षीय वृद्धेचा मृतदेह; उष्माघाताने नाही तर हृदयविकाराने मृत्यू झाला

यावल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील अट्रावल येथे ८० वर्षीय वृद्ध महिलेचा शेतात मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. ही महिला मंगळवारी शेतात गेली होती. उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. यानंतर बुधवारी मृतदेह आढळला. याप्रकरणी यावल पोलिसांत दाखल अकस्मात मृत्यूच्या प्रकरणात महिलेचा मृत्यू उष्माघाताने झालेला असावा असा उल्लेख आहे. मात्र, डॉक्टरांनी ही शक्यता नाकारून हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे सांगितले.

लिलाबाई रामकृष्ण चौधरी (वय ८०) व त्यांचे पती रामकृष्ण चौधरी हे दोघे अट्रावल येथे राहतात. मंगळवारी सकाळी लिलाबाई शेतात जावून येते असे सांगून घरून निघाल्या. सायंकाळी उशिरापर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. यामुळे बुधवारी सकाळपासून पोलिस पाटील पवन चौधरी, चंद्रकांत चौधरी, योगेश चौधरी, रवींद्र चौधरी, अभय महाजन यांनी शोध घेतला. त्यात सकाळी १० वाजता लिलाबाई अट्रावल शिवारातील नामदेव धनजी चौधरी यांच्या बांधावर असलेल्या पाण्याच्या चारीत मृतावस्थेत आढळल्यात. याप्रकरणी परेश रमेश चौधरी यांच्या खबरी वरून यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली. त्यात मंगळवारी अधिक तापमान असल्याने लिलाबाईंचा मृत्यू उष्माघाताने झालेला असावा असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन : दरम्यान, यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.बी.बारेला, वैद्यकीय अधिकारी डॉ.मयूर चौधरी यांनी शवविच्छेदन केले. त्यांना मृत्यूचे कारण विचारले असता, हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे सांगितले. तपास हवालदार अशोक जवरे करत आहे.

बातम्या आणखी आहेत...