आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्ला:कर्जोद येथे विवाहितेसह तिघांवर जीवघेणा हल्ला ; स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर

रावेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कर्जोद येथील विवाहिता घरात एकटी होती. यावेळी घरात अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्यास तिने शिविगाळ केली. याचा राग आल्याने अनिल ससाणे याने विवाहितेसह अन्य दोघांवर केळी कापण्याच्या बख्खीने वार करून जखमी केले. यानंतर स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली. या प्रकरणी अनिल ससाणे विरुद्ध गुन्हा दाखल झाला. कर्जोद येथील विवाहिता पूनम विलास ससाणे ही घरात एकटी होती. यावेळी अनिल रमेश ससाणे याने तिच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. यामुळे विवाहितेने त्याला जाब विचारून शिवीगाळ केली. त्याचा राग आल्याने अनिलने केळी कापण्याच्या बख्खीने पूनमच्या गळ्यावर तीन व हातावर एक असे चार वार केले. तिची सासू रमाबाई ससाणे यांनी प्रतिकार केल्यावर अनिलने तिच्यावरही वार केला. तर गावातीलच गौतम गिरधर ससाणे हा अनिलला आवरण्याठी गेला असता त्याच्यावरही वार केला. त्यात जखमी तिघांना रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पूनमची स्थिती गंभीर असल्याने तिला जळगाव येथे हलवण्यात आले. यावेळी अनिलने पूनमची दिराणीला मध्ये आल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. याप्रकरणी ज्योत्स्ना ससाणे यांच्या फिर्यादीवरून अनिल ससाणे विरुद्ध गुन्हा दाखल झाला. दरम्यान, या घटनेनंतर आरोपीने स्वत:हून पोलिस ठाणे गाठून झालेला प्रकार कथन केला.

बातम्या आणखी आहेत...