आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या वादातून जोरदार हाणामारी:तरवाडेत दोन महिलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न; मारवड पोलिसात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पाडळसरेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथून जवळच असलेल्या तरवाडे येथे जुन्या वादातून जोरदार हाणामारी झाली. यात दोन महिलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार मारवड पोलिसात दाखल झाली आहे. त्यानुसार शनिवारी रात्री उशिरा नऊ जणांविरुद्ध दंगल, विनयभंगासह एकूण १२ कलमान्वये गुन्हा दाखल झाला.याबाबत तरवाडे येथील विजय सदाशिव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा भाऊ संदीप याने गावातील शरद उखा पवार व ॲड. अलका शेळके मोरे यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. त्या रागातून ३ सप्टेंबर रोजी सकाळी शरद व विनोद पवार यांनी संदीप याच्या पत्नीस अडवत आमच्याविरुद्ध केलेले गुन्हे मागे घ्या, नाहीतर जिवंत सोडणार नाही, असे सांगून विनयभंग केला. महिलेने घडलेला प्रकार घरी सांगितला.

तोपर्यंत त्यांच्या घरासमोर विनोद सुकदेव पवार, नितीन उखा पवार, रूपाबाई उखा पवार, शरद उखा पवार, उखा बुधा पवार, विमलबाई उखा पवार, रतिलाल रामलाल पाटील, हर्षल रतिलाल पाटील व प्रमोद रतीलाल पाटील (रा.पिंपळे) हे लाठ्या काठ्या, लोखंडी रॉड व पेट्रोल घेऊन दाखल झाले. संशयितांनी फिर्यादीची आई व वहिनी यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादी व त्याचा भाऊ संदीप यांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण करत मिरची पावडर फेकली. संदीप यास रॉडने छातीवर व लाकडी दांड्याने डोक्यावर गंभीर दुखापत केली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या सतिश पाटील यालादेखील मारहाण करण्यात आली. त्यानतंर ग्रामस्थांनी संदीप व सतीश यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पुढील तपास एपीआय जयेश खलाने हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...