आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील अकलूद येथील ५६ वर्षीय इसमाने आठवडाभरातदोनवेळाआत्महत्येचाप्रयत्न केलाहोता. यानंतरराहत्या घरातरुमालाने गळफास घेतलेल्या व गळा कापलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. मृतदेह यावल रुग्णालयातून सुक्ष्म शवविच्छेदनासाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आला. अकलूद येथील दीपक काशीनाथ पाटील यांनी फैजपूर पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार त्यांचे वडील काशीनाथ विश्वनाथ पाटील (वय ५६) हे भुसावळ येथे रेल्वेत नोकरीला होते.
त्यांना मद्यपानाचे व्यसन होते. त्यांच्या हातापायाला विविध प्रकारची ऍलर्जी होत होती. त्यांनी मागील आठवड्यात भुसावळ येथील पाण्याच्या टाकीवरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना खाली उतरवले होते. त्यानंतर त्यांनी तापी पुलावरून उडी घेण्याचा प्रयत्न केला होता. तेथून देखील त्यांना वाचवण्यात आले होते. आता सोमवारी ते त्यांच्या खोलीत झोपले होते.
मात्र, बराच वेळ होऊनही प्रतिसाद नसल्याने खिडकीतून डोकावून पाहिल्यावर त्यांनी खिडकीच्या सळईला रुमाल बांधून गळफास घेतल्याचे दिसले. दरवाजा तोडून आत गेल्यावर गळफास घेतलेल्या रुमालासह त्यांच्या शर्टावर रक्ताचे डाग दिसले. त्यांचा गळा कापलेला होता. फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. नंतर मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणला. सुक्ष्म शवविच्छेदनासाठी मृतदेह जळगावला हलवण्यात आला. याबद्दल कुटुंबीयांना संशय आहे. त्यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती एपीआय सिद्धेश्वर आखेगावकर यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.