आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागृती माेहिमेस सुरुवात:पीक विमा प्रचार रथाद्वारे हाेणार शेतकऱ्यांत जागृती

यावल6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी रथाचे आगमन झाले आहे. शहरातील तालुका कृषी विभागाकडे हा रथ आला असून येथून जागृती माेहिमेस सुरुवात झाली. हा रथ संपूर्ण तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये पीक विम्याबाबत जागृती घडवणार आहे.

शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा, त्याचा कशाप्रकारे शेतकऱ्यांना फायदा होतो, याची माहिती या प्रचार रथाच्या माध्यमातून दिली जात आहे. शहरातील विरावली रस्त्यावर असलेल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात हा रथ दाखल झाल्यानंतर तालुका कृषी अधिकारी सागर सिनारे यांच्या हस्ते या तालुक्यातील जनजागृती मोहिमेची सुरुवात करण्यात आली. हा रथ आता ग्रामीण भागात रवाना झाला असून पीक विम्याबाबत शेतकऱ्यांत जागृती केली जाणार आहे. या प्रचार रथ माेहिमेच्या शुभारंभ प्रसंगी कृषी अधिकारी सिनारेंसह भगवान मालचे, पीक विमा कंपनी प्रतिनिधी विकास शिंदे उपस्थित होते. शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वीच पीक विमा योजनेत सहभागी हाेण्याचे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...