आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुर्वेदिक चिकित्स:आयुर्वेदिक चिकित्सालयाची अन्न औषधकडून सलग 3 तास तपासणी

भुसावळ9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव येथील अन्न व औषध प्रशासन विभागाने शुक्रवारी भुसावळ शहरातील शिव कॉलनी भागातील वैद्य एस.जी.करमंचे यांच्या आयुर्वेदिक चिकित्सालय व औषधालयाची तीन तास तपासणी केली. येथे आयुर्वेदिक जडीबुटीत अॅलोपॅथी औषधांची भुकटी मिसळून दिली जाते, अशी लेखी तक्रार विभागाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार तपासणी झाली. मात्र, त्यात आक्षेपार्ह काहीही आढळले नाही. तरीही पथकाने दोन नमुने संकलित केले. - उर्वरित पान ४

अहवालानंतर ठरणार कारवाईची दिशा
तपासणीत अॅलोपॅथीची औषधी आढळली नाही. तरीही दोन आयुर्वेदिक औषधांचे नमुने घेतले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल पाहून कारवाई होईल.ए.एम.माणिकराव, औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन विभाग, जळगाव

बातम्या आणखी आहेत...