आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविकांना त्रास:मुक्ताईनगरात रेणुकानगर भागात रस्त्यांची दुरवस्था

मुक्ताईनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात बस स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या रेणुकानगरात रस्त्यांची चाळण झालेली आहे. या भागातील रहिवाशांना त्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.या भागातील रस्ते कच्चे असून खडीकरण केलेले आहे. मात्र, कालांतराने रस्त्यावरील खडी उखडल्याने समस्या वाढली आहे. या भागामध्ये रेणुका मातेचे मंदिर असून असंख्य भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात. मात्र, खड्डेमय रस्त्यामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागतो. गेल्या पावसाळ्यातही खड्डेमय रस्त्यांमुळे या भागात अनेकदा किरकोळ अपघात झाले.

त्यामुळे पालिकेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत नगरपंचायतीकडे अनेकदा नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र समस्येची दखल घेण्यात आलेली नाही. तसेच या भागामध्ये गटारी नामशेष झाल्याने सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा होत नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. समस्येची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...