आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचिनावल वडगाव शिवारातील उभी केळी काही समाजकंटकांनी ३१ डिसेंबरला रात्री कापून फेकली. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सर्वशक्ती सेनेतर्फे करण्यात आली. यासंदर्भात प्रांताधिकारी आणि डीवायएसपींना निवेदन दिले. चिनावल येथील पंकज नारखेडे, वडगाव येथील डॉ. मनोहर पाटील व दगडु पाटील यांच्या शेतात, अज्ञात व्यक्तींनी ४५०० खोडे कापून फेकले होते. त्यामुळे या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला उत्पन्नाचा घास माथेफिरूंमुळे हिरावला आहे. त्यामुळे रावेर तालुक्यातील शेतकरी भयभीत झाले आहेत. हे प्रकार वारंवार घडत असूनही आजवर ठोस कारवाई झालेली नाही.
त्यामुळे समाजकंटकांची हिंमत वाढत आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, असे निवेदन फैजपूर येथील प्रांताधिकारी कैलास कडलग व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांना दिले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास, जिल्ह्यात सर्वशक्ती सेनेतर्फे आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा भाजप अनु. जाती मोर्चा राज्य सचिव प्रा. संजय मोरे, राज्य उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे, गजानन काडेले, जिल्हाध्यक्ष मयूर कोळी, विष्णु मोरे, विजय तायडे, राजेंद्र पाटील उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.