आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाेघा संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल:बकऱ्या चारण्यास मनाईवरून‎ केळीची झाडे कापून फेकली‎

यावल‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केवळ बकऱ्या चालण्यास मनाई केल्याच्या ‎कारणावरून येथील केळी उत्पादक शेतकऱ्याच्या ‎शेतातील केळी झाडे कापून दोन संशयितांनी सुमारे सव्वा लाखांचे नुकसान केले आहे. ही घटना‎ शुक्रवारी सकाळी उघडकीस आली असून या‎ प्रकरणी येथील पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल ‎करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी रावेर तालुक्यात केळीची झाडे कापून नुकसान केले हाेते. आता‎ यावल येथेही त्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने ‎शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.‎ दरम्यान दाेघा संशयितांवर गुन्हा दाखल करून‎ त्यांना पाेलिसांनी ताब्यात घेतली.‎ शहरातील शेतकरी निर्मल नथ्थू चोपडे यांचे‎ यावल शिवारात शेत (गट क्र. ८०८) आहे. त्यात‎ त्यांनी केळीची लागवड केली आहे. केळीची‎ बऱ्यापैकी वाढ झाली असून सध्या आठ महिन्याचे‎ पीक झाले आहे

. त्यांच्या या शेतालगतच अट्रावल‎ गावातील बकऱ्या चारणारे गुराखी येतात. दोन‎ दिवसांपूर्वी सायंकाळी अट्रावल येथील सागर‎ मानेकर व नामदेव कोळी हे दोघे शेतातून बकऱ्या‎ नेत असताना त्यांना शेतकरी निर्मल चोपडे यांनी‎ शेतात बकऱ्या चारण्यास मनाई केली होती. तेव्हा‎ या दोघांनी चोपडे यांना धमकी दिली होती की,‎आता तू केळीचा हंगाम कसा घेताे हेच पाहू.‎

दरम्यान शुक्रवारी चोपडे यांचा सालदार मिलिंद‎ नेमाडे शेतात गेले असता त्यांना केळी पिकाची‎ झाडे कापून फेकल्याचे निदर्शनास आले. त्यांनी‎ शेतकरी निर्मल चोपडे यांना माहिती दिली. शेतात‎ जावून पाहिले असता सुमारे १५० केळीची झाडे‎ कापून टाकल्याचे दिसून आले. ही झाडे धमकी‎ दिल्यानुसार सागर मानेकर व नामदेव कोळी, रा.‎ अट्रावल यांनीच कापून फेकल्याचा संशय व्यक्त‎ करत यावल पोलिसांत दोघांविरुद्ध फिर्याद दिली.‎ पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी तातडीने‎ दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून हवालदार‎ राजेंद्र पवार तपास करत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...