आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा संघर्ष:बाप्पाचे भक्त करणार 1,750 वृक्षांचे संवर्धन ; पर्यावरण जागरतर्फे शहरात उपक्रम

भुसावळ14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉटसिटी म्हणून ओळख असलेल्या भुसावळ शहराचे तापमान नियंत्रणात राहावे यासाठी यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणाचा जागर करण्यात आला. गणेश विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना पर्यावरण जागर प्रतिष्ठानने २५०, तर बल्लाळेश्वर चौकातील युवा संकल्प प्रतिष्ठानने दर्शनासाठी आलेल्या भाविकांना १५०० रोपांचे वितरण केले. भाविकांनी प्रसाद रुपातून मिळालेल्या या रोपंचे संवर्धन करण्याची ग्वाही दिली आहे.

शहरातील युवा संकल्प प्रतिष्ठानने बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दीड हजार रोपे वाटली. या कार्यक्रमाला रेल्वेचे अप्पर प्रबंधक रुकमैय्या मिणा, बाजार समितीचे माजी सभापती सचिन चौधरी, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नीलेश चौधरी उपस्थित होते. दुसरीकडे गणेश विसर्जनावेळी तापी पात्रात भुसावळ पालिका व पर्यावरण जागर प्रतिष्ठानने भाविकांना श्रीगणेशाच्या स्मृती जपण्यासाठी २५० वृक्षांचे वितरण केले. प्रतिष्ठानचे नाना पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला.

तापमान कमी होईल वृक्ष लागवडीला चालना देण्यासाठी भाविकांना प्रसाद स्वरुपात वृक्षरोपांचे वाटप केले. भाविकांनी या वृक्षांचे संगोपन करण्याचा शब्द दिला आहे. दरवर्षी गणेशोत्सवात असा उपक्रम राबवल्यास तापमान कमी होईल. नीलेश चौधरी, संस्थापक अध्यक्ष, युवा संकल्प प्रतिष्ठान, भुसावळ

बातम्या आणखी आहेत...