आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्साह:खंडेराव यात्रेनिमित्त न्हावी येथे बारागाड्या‎

न्हावी‎17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील खंडेराव मंदिर‎ देवस्थानकडून होळीच्या‎ यात्राेत्सवानिमित्त साेमवारी‎ संध्याकाळी सहा वाजता बारा‎ गाड्या ओढण्यात आल्या. या‎ कार्यक्रमात कुठलाही अनुचित‎ प्रकार घडू नये यासाठी फैजपूर‎ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पाेलिस‎ निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर,‎ पोलिस कॉन्स्टेबल बऱ्हाटे व त्यांच्या‎ सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.‎ ग्रामस्थांच्या सहकार्याने‎ बारागाड्यांचा कार्यक्रम माेठ्या‎ उत्साहात व निर्विघ्न पार पडला.‎

साेमवारी संध्याकाळी चार‎ वाजता खंडेराव मंदिर परिसरातून‎ भगत, विश्वस्त, गावातील मान्यवर‎ व ग्रामस्थ यांनी गावातून मिरवणूक‎ काढून भारत विद्यालयाच्या‎ गेटसमोरील बारागाड्यांना पाच‎ फेऱ्या मारल्या. त्यानंतर मानकरी‎ भगत यांच्या कमरेला बारागाड्यांचा‎ हुक अडकवून बारागाड्या‎ ओढण्यात आल्या. ते पाहण्यासाठी‎ संपूर्ण परिसरात जनसागर जमला‎ होता.

बारागाड्यांच्या मार्गात कोणी‎ येऊन काही अनुचित प्रकार घडू नये‎ यासाठी पोलिस शिटी वाजवून‎ प्रसंगी हाताने लाेकांना मागे ढकलत‎ होते. या वर्षी बारागाड्या‎ आेढण्याचा मान खंडेराय भक्त‎ चंद्रकांत गाजरे यांना मिळाला.‎ गावातील तसेच परिसरातील‎ भक्तांनी यात्रेचा आनंद घेतला.‎

खंडेराव देवस्थानचे सर्व‎ पदाधिकारी, शरद महाजन, जिल्हा‎ दूध संघांचे सदस्य नितीन चौधरी,‎ सरपंच देवेंद्र चोपडे, अक्षय‎ पतसंस्थेचे चेअरमन सुनील फिरके,‎ ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य‎ विभाग, वीज महावितरण कंपनीचे‎ अधिकारी, कर्मचारी, राजकीय‎ पक्षांचे पदाधिकारी यांनी‎ कार्यक्रमास सहकार्य केले. या‎ कार्यक्रमामुळे आबालवृद्धांमध्ये‎ माेठा उत्साह दिसून आला.‎

बातम्या आणखी आहेत...