आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:रेल्वेमार्ग भूसंपादनात कवडीमोल दर

भुसावळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साकेगाव-भुसावळ दरम्यान रेल्वेच्या चौथी लाइनसाठी भूसंपादन झाले. त्यात ज्या ठिकाणी ७५० रूपये प्रती स्क्वेअर फूट भाव आहे, तेथे फक्त ३४ रूपये इतका कवडीमोल भाव दिला आहे, अशी खंत साकेगाव येथे शेतकऱ्यांनी मंत्र्यांकडे निवेदनातून व्यक्त केली.

शेतकऱ्यांना साडेतीन लाख रुपये एकरी भाव गृहीत धरून शासकीय अधिग्रहण नियमानुसार या भावाच्या पाच पट मोबदला मिळणे अपेक्षित आहे. यानुसार शेतकऱ्यांना एकरी १३ लाख रुपये दर मिळाला पाहिजे. मात्र उलटपक्षी याच क्षेत्रात वाघूर पाटचारीचा मोबदला केंद्र सरकार प्रकल्पा पेक्षा जास्त मिळाला आहे. त्यामुळे आता सुरू असलेली भूसंपादनाची प्रक्रिया संशयास्पद आहे. त्यासाठी पारित झालेला आदेश रद्द कराव, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे यांना भूसंपादित शेतकऱ्यांनी निवेदन दिले.

बातम्या आणखी आहेत...