आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक:सामाजिक संघटनांनी भेट दिलेले बॅरिकेड्स गटारात, पोलिसांचे दुर्लक्ष

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास रस्ते बंद करणे, वाहतूक वळणे आदी वेगवेगळ्या कामांसाठी पोलिसांना बॅरिकेड्सची गरज पडते. शहरातील विविध सामाजिक संघटनांनी पोलिस प्रशासनाला मदतीचा हात म्हणून असे बॅरिकेड्स भेट दिले होते. मात्र, गेल्या महिन्यापासून हे बॅरिकेड्स गटारात, तर कुठे धूळ खात पडले आहे. वेगवेगळे सण-उत्सव, जयंतीनिमित्त मिरवणुका निघातात. शिवाय वर्षभर वेगवेगळी आंदोलने सुरू असतात. अशावेळी रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यासाठी पोलिस बॅरिकेड्सचा वापर करतात. मात्र, पोलिस प्रशासनाकडे मोजके बॅरिकेड्स असल्याने वेळप्रसंगी रस्ते बंद करण्यासाठी बांबू, दोरखंडाचा वापर करावा लागतो. पोलिसांची ही गैरसोय टाळण्यासाठी शहरातील सामाजिक संघटनांनी पोलिस प्रशासनाला बॅरिकेड्स भेट दिले होते. तर तुटलेल्या १२ बॅरिकेड्सची पोलिसांनी दुरुस्ती व रंगरंगोटी करून घेतली. मात्र, आता अनेक ठिकाणी हे बॅरिकेड्स बेवारस पडून आहेत. भेट मिळालेल्या हे साहित्य काही ठिकाणी चक्क गटारात पडलेले आहे. पोलिस प्रशासनाने दखल घेणे अपेक्षित आहे.

बातम्या आणखी आहेत...