आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोशल नेटवर्कवरील स्टेटस आणि धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी यावल शहरात मंगळवारी रात्री पुन्हा वाद उफाळला. यामुळे दंगलसदृश्य परिस्थिती तयार झाल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
शहरातील एका तरुणाने धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट व्हायरल केली. याबाबत तक्रार करत असताना मोठ्या संख्येने जमाव एकत्र झाला. धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्याला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी जमावाने केल्याने दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी बुरूज चौकासह परिसरात लाठीचार्ज केला. डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे हे शहरात दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत विविध भागात पोलिसांचा बंदोबस्त होता. दरम्यान, तेढ निर्माण करणाऱ्यावर कारवाईसाठी सोमवार आणि मंगळवारी देखील पोलिसांची भेट घेण्यात आली होती. हा प्रकार पोलिसांनी शांतता समितीची बैठक घेतली. त्यात शहरात सलोखा, शांतता टिकवण्याचे आवाहन करण्यात आले. यानंतर रात्री पुन्हा तणाव निर्माण झाला.
भुसावळ शहरात रविवारी झालेल्या पावसानंतर तापमानात काहीशी घसरण झाली होती. मात्र, मंगळवारी शहराचे तापमान पुन्हा चाळिशीवर पोहोचले. सोमवारी ३८.८ अंश तापमान होते. मंगळवारी त्यात १.२ अंशांची वाढ झाली. रात्रीचे किमान तापमान ३३.३ अंश होते.
मान्सून घेऊन आले गर्जन्मेघ
खान्देशात गर्जन्मेघ (क्युमुलोनिंबस, cb) दाखल झाले. अवघ्या २ हजार मीटर उंचीवरील हे बाष्पयुक्त ढग मान्सूनचा संकेत देणारे आहेत. आयएमडीच्या अंदाजानुसार बुधवार आणि गुरूवारी जिल्हाभरात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.