आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणगौरव:गुणवंतांनो शिकून मोठे व्हा, पण आई-वडिलांनाही जपा ; रमेश पाटील यांनी मांडली अपेक्षा

भुसावळ24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुणवंतांनी अजून शिकून मोठे व्हावे. उच्च पदावर जावे. मात्र आई-वडिलांना विसरु नये, अशी अपेक्षा भोर लेवा पंचायतीचे कुटूंब नायक रमेश पाटील यांनी व्यक्त केली. रविवारी संतोषी माता सभागृहात अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे समाजातील ३५० गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, महासंघाचे अध्यक्ष अॅड.प्रकाश पाटील, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक, गिरीश महाजन, चेतन पाटील, श्रेयस इंगळे, महासंघाचे उपाध्यक्ष राजेश सुधाकर चौधरी, शहराध्यक्ष देवेंद्र वाणी उपस्थित होते. आमदार भोळे यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी, असे सांगितले. यानंतर दहावी, बारावी, पदवी, पदविका, पदव्युत्तर व विविध विद्या शाखांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या ३५० गुणवंतांचा सत्कार झाला. प्रास्ताविक अॅड.प्रकाश पाटील यांनी केले. गुणगौरव समितीचे अध्यक्ष श्याम भारंबे, उपाध्यक्ष रूपेश चौधरी व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...