आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:सरकारच्या निषेधासाठी प्रांत कार्यालयाच्या‎ आवारात घंटानाद, चुलीवर तयार केला चहा‎

भुसावळ‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घ्यावी या‎ मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने‎ भुसावळ प्रांत कार्यालयाच्या आवारात‎ घंटानाद व चुलीवर चहा करत केंद्र‎ सरकारचा निषेध केला. या आंदोलनास‎ शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे)‎ पाठिंबा दिला होता.‎ गुरूवारी दुपारी १२ वाजता प्रांत‎ कार्यालयाच्या आवारात घंटानाद व‎ चुलीवर चहा करण्याचे आंदोलन सुरू‎ झाले. त्यात केंद्र सरकारने गॅस सिलिंडर‎ किमतीमध्ये भरमसाठ वाढ करून‎ सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

‎सरकारने गॅस सिलिंडरची दरवाढ मागे‎ घ्यावी, या मागणीसाठी जिल्हाध्यक्ष विनोद‎ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा‎ महासचिव दिनेश इखारे, महिला आघाडी‎ जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे, माथाडी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कामगार युनियन जिल्हाध्यक्ष बालाजी‎ पठाडे यांच्या उपस्थितीत आंदोलन‎ करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख‎ समाधान महाजन, मीरा वानखेडे, बाळा‎ पवार, गणेश इंगळे, गणेश जाधव, देवदत्त‎ मकासरे, कुणाल सुरडकर, छाया हिरोळे,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ भारती इंगळे, शेख मिसा, ज्योती गांधी,‎ शोभा तायडे, शैला तायडे, शिवसेनेचे‎ संतोष सोनवणे, नीलेश महाजन, बबलू‎ बऱ्हाटे, दीपक धांडे, हेमंत खंबायत,‎ गोकुळ बाविस्कर, राजू इंगळे, सोनी‎ ठाकुर, पिंटू भोई आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...