आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वकील संघाचा पुढाकार‎:सावधान ! न्यायालय परिसरात धुम्रपान केल्यास होणार दंड, कारवाई‎

भुसावळ‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ न्यायालयात वेगवेगळ्या‎ कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांनी गुटखा,‎ तंबाखू, पानसुपारी खाऊन येऊ नये.‎ न्यायालयात धुम्रपान करताना आढळल्यास‎ दंड, कायदेशीर कारवाई होईल. या अनुषंगाने‎ बुधवारी न्यायालय परिसर धुम्रपान प्रतिबंधित‎ क्षेत्र असल्याचा फलक दर्शनी भागात‎ लावण्यात आला.‎ अनेक जण न्यायालयाच्या आवारात‎ गुटखा, तंबाखू, पानसुपारी खातात, धुम्रपान‎ करतात. यावर निर्बंध घालण्यासाठी‎ न्यायालयाचा परिसर धुम्रपान प्रतिबंधित क्षेत्र‎ म्हणून घोषित करण्यात आला. कोणालाही‎ न्यायालय परिसरात गुटखा, तंबाखू खाऊन‎ प्रवेश करता येणार नाही. संत गाडगे महाराज‎ स्वच्छता अभियान आणि नवीन वर्षाच्या‎ पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात स्वच्छता‎ केली जाणार आहे. वकील संघ, कर्मचारी‎ ही मोहीम यशस्वी करतील. बुधवारी धुम्रपान‎ प्रतिबंधित क्षेत्राचा फलक लावताना वकील‎ संघाचे अध्यक्ष तुषार पाटील यांच्यासह‎ पदाधिकाऱ्यांमध्ये धनराज मगर, रमू पटेल,‎ पुरूषाेत्तम पाटील, राजेश काेळी, विजय‎ तायडे, दिलीप निकम, महेश चाैधरी, किशाेर‎ राजपूत, महेश तिवारी, विवेक आवरे,‎ इस्माईल शेख यांच्यासह कर्मचाऱ्यांची‎ देखील उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...