आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्ताहाचे आयोजन:विवरे येथे भागवत पारायण अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह; ११ रोजी काल्याच्या कीर्तनाने समारोप, सायंकाळी दिंडी

रावेर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील विवरे बुद्रूक श्रीमद भागवत सप्ताह समितीतर्फे, श्रीमद् भागवत पारायण व अखंड हरिनाम संकिर्तन सप्ताहाचे आयोजन केले आहे. ४ ते ११ सप्टेंबर या काळात श्रीमद् भागवत कथावाचन, आचार्य सुरेंद्र महाराज धर्माधिकारी (सुटाळा, ता.खामगांव) हे करणार आहेत.

विवरे बुद्रूक येथील हनुमान मंदिरात समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने अखंड हरीनाम संकीर्तन सप्ताहाला रविवारपासून प्रारंभ झाला आहे. दररोज सकाळी काकडा, ९ ते १२ व दुपारी ३ ते ५ या काळात श्रीमद्भागवत पारायण, संध्याकाळी ५ ते ७ हरिपाठ, रात्री ८ ते १० कीर्तन अस प्रकारे दैनंदिन कार्यक्रम राहिल. तर ५ रोजी सुरेंद्र महाराज धर्माधिकारी (सुटाळा), ६ रोजी संजय महाराज (बाम्हंदा, ता.खामगाव), ७ रोजी गोकुळ महाराज (खिरवड, ता.रावेर), ८ रोजी पुरुषोत्तम महाराज (श्रीराम आश्रम, खामगांव), ९ रोजी हनुमान भजनी मंडळ तर १० रोजी गोपाळ महाराज (विवरे बुद्रूक, ता.रावेर) यांची कीर्तने होतील. ११ रोजी रवींद्र हरणे महाराज (मुक्ताईनगर) यांचे काल्याचे कीर्तन सकाळी १० ते १२ या वेळेत होईल. तर दुपारी महाप्रसाद व सायंकाळी दिंडी निघेल. श्री हुनुमान मंदीर भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ विवरे बुद्रूक, खुर्द गावातील समस्त भजनी मंडळ व ग्रामस्थ, पंचक्रोशितील उटखेडे, भाटखेडे येथील टाळकरी भजनी मंडळांचे अनमोल सहकार्य लाभत आहे. सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन श्रीमद्भागवत कथा सप्ताह समितीने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...