आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंपास:भालोदला मंदिरांमध्ये भर दिवसा चोरी; तीन मोठे घंटे चोरट्यांकडून लंपास

भालोद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भालोद- बामणोद रस्त्यावर गावापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कुलस्वामिनी एकवीरा देवीच्या मंदिरात रविवारी दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान मंदिरातील तीन घंटे चोरट्यांनी लंपास केले.

संध्याकाळी सहा वाजता गावातील काही नागरिक मंदिरात आरतीसाठी गेले असता त्यांना तेथे घंट्यांची कडी वाकलेली दिसली. तपासानंतर घंट्यांची चोरी झाल्याचे कळाले. परिसरातील भंगार विक्रेते व भांड्याच्या व्यापाऱ्यांना, जर मंदिरात वाजवण्याची घंटा कोणी आणून मोड विकण्याचा प्रयत्न करत असेल तर ती घेऊ नये, असे आवाहन राजेंद्र नेहेते, देविदास चौधरी, शिरीष नेहेते यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...