आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यावसायिक धडे:भालोदला स्काऊट गाइडचा खरी‎ कमाई उपक्रम, पालकांचा प्रतिसाद‎

यावल‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील भालोद येथे स्काऊट‎ गाइडकडून खरी कमाई या उपक्रमातून‎ विद्यार्थ्यांना व्यावसायिक धडे देण्यात‎ आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी विविध‎ खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावून व्यवसाय‎ केला. पालकांनी देखील खरेदी केली.‎ विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, स्वावलंबन,‎ श्रमप्रतिष्ठा इत्यादी गुणांचा विकास‎ करण्यासाठी स्काऊट गाइडकडून विविध‎ उपक्रम राबवले जातात. त्यासाठी ‘खरी‎ कमाई'' हा एक उपक्रम राबवला जातो.‎ शाळेतील स्काऊट प्रमुख जी.एस.पाटील,‎ गायत्री जावळे यांच्या संयुक्त प्रयत्नातून‎ शाळेत शनिवारी खरी कमाई हा उपक्रम‎ घेण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन‎ सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन‎ लीलाधर चौधरी यांच्या हस्ते झाले.‎ संस्थेचे अध्यक्ष अनिल चौधरी, ज्येष्ठ‎ संचालक मोहन चौधरी, नारायण चौधरी,‎ सचिव नितीन चौधरी, लीलाधर नारायण‎ चौधरी, भास्कर पिंपळे व संचालक‎ उपस्थित होते. मुख्याध्यापक‎ डी.व्ही.चौधरी, आर. एस.जावळे यांनी‎ मार्गदर्शन केले.‎

बातम्या आणखी आहेत...