आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:फैजपुरात भरडधान्य‎ दौड, नोंदणी करा मोफत‎

फैज2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर‎ सातपुडा विकास मंडळ, पाल‎ संचालित कृषी विज्ञान केंद्रातर्फे‎ दि.४ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत‎ भरड धान्य दौड (मॅरेथॉन) व कृषी‎ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले‎ आहे.‎ कृषी प्रदर्शनानिमित्त एक धाव‎ शेतकऱ्यांसाठी या उपक्रमात,‎ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात‎ येणार आहे. आमदार शिरीष चौधरी‎ यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम‎ राबवला जात आहे. या स्पर्धेत‎ विजयी होणाऱ्या विजेत्यास ११११‎ रुपये, द्वितीय ७५१ रुपये, तर तृतीय‎ बक्षीस ५५१ रुपये व सन्मानचिन्ह‎ देऊन गौरवण्यात येणार आहे.‎

स्पर्धेचे ठिकाण लोकसेवक‎ मधुकरराव चौधरी फार्मसी कॉलेज‎ शेजारील मैदान, फैजपूर हे आहे.‎ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी‎ कोणत्याही स्वरूपाचे नोंदणी शुल्क‎ नाही. केवळ‎ https://forms.gle/GX‎ PLQ6CkN5EEgKWQ9 या‎ लिंकवर नोंदणी करावी, असे‎ अावाहन संस्थेचे सचिव अजित‎ पाटील यांनी केले. मॅरेथॉन स्पर्धा‎ दिनांक ४ रोजी पुरुषांसाठी पाच‎ किलोमीटर आणि महिलांसाठी तीन‎ किलोमीटर अंतराची असणार आहे.‎ स्पर्धा दुपारी २.१५ वाजता सुरूवात‎ होणार आहे. परिसरातील जास्तीत‎ नागरिकांनी स्पर्धेत सहभाग‎ नोंदवावा, असे आवाहन केले.‎

बातम्या आणखी आहेत...