आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाेरगाव लेवा पंचायतीने रविवारी समाजातील विधवा, विधूर, प्रौढ, शेतकरी, अपंग अशा वधू-वरांची सूची प्रकाशन व परिचय मेळावा घेतला. शहरातील संतोषी माता हॉलमध्ये आयोजित या सलग दहाव्या मेळाव्यात दोन विवाह जुळले. यामुळे सोहळा खऱ्या अर्थाने सार्थकी लागल्याची भावना पंचायतीने व्यक्त केली. या मेळाव्याला राज्यभरातून अनेक वधू-वर व त्यांचे पालक उपस्थित होते.
व्यासपीठावर ललित पाटील, भुसावळ शाखेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश पाटील, सचिव डॉ. बाळू पाटील, आरती चोधरी उपस्थित होते. प्रकल्प चेअरमन आरती चौधरी यांनी प्रास्ताविकात, जास्तीत जास्त वधू-वरांना नोंदणी शक्य व्हावी यासाठी गुगल फॉर्मची सुविधा उपलब्ध करून दिली. ऑनलाइन अर्ज स्वीकारले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हे काम अव्याहत सुरू असल्याचे सांगितले. यानंतर निस्पृहपणे समाजसेवा करणारे प्राची राणे, मनोज जावळे, दिनेश राणे, वासुदेव इंगळे यांचा सत्कार झाला. अॅड.प्रकाश पाटील यांनी, सध्याच्या तरूण पिढीची सहनशक्ती कमी झाल्याने घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. अनेकवेळा गरोदर असलेल्या मुली देखील घटस्फोटासाठी येतात, तेव्हा वाईट वाटते. मात्र, आम्ही तुटू पाहणारे संसार सावरण्याचा प्रयत्न करतो असे सांगितले. माजी आमदार नीळकंठ फालक यांनी, केवळ पुण्यात होणारा परिचय सूची प्रकाशन व परिचय मेळावा हे कार्यक्रम दहा वर्षांपासून भुसावळात होत असल्याचे समाज बांधवांची सोय झाल्याची माहिती दिली. यावेळी अंजाळे (ता.यावल) येथील सुधीर चौधरी यांनी सामूहिक विवाहांसाठी पाच हजारांची देणगी जाहीर केली. नंतर परिचय सूचीचे प्रकाशन झाले. महेश फालक. शरद फेगडे, मंगला पाटील, डिगंबर महाजन, आर.जी.चौधरी, परीक्षित बऱ्हाटे, जळगावच्या ज्योत्स्ना बऱ्हाटे, नीला चौधरी, चंदन महाजन, सुनील खडके, विनीत हंबर्डीकर, मनोज जावळे, पल्लवी ढाके उपस्थित होत्या.
२७ जणांनी दिला परिचय... नागपूर, पुणे, मुंबई, इंदूर, अकोला, नाशिक, यावल, रावेर येथून पालक व वधू-वरांसह सुमारे ४०० जण मेळाव्यात सहभागी होते. त्यापैकी १० मुली व १७ मुलांनी परिचय दिला. या मेळाव्यात एका घटस्फोटित मुलीचा विवाह जुळला, तर एका विधवा मुलीचा विवाह ठरण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.