आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिपूजन:स्वामी समर्थ केंद्र सभागृहाचे भूमिपूजन, आमदार चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते उचंदा येथील सभागृहाचे लोकार्पण

अंतुर्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकटदिनाचे औचित्य साधून मुक्ताईनगर मतदारसंघातील सावदा (ता.रावेर) येथे सुगंगानगरात, तसेच ऐनपूर येथे श्री स्वामी समर्थ साप्ताहिक व बालसंस्कार केंद्राजवळ सभागृह बांधकामाचे भूमिपूजन झाले.

रेंभोटा येथे दरबार स्थापना तसेच उचंदा (ता.मुक्ताईनगर) येथे श्री स्वामी समर्थ साप्ताहिक व बालसंस्कार केंद्राजवळ सभागृह बांधकामाचे लोकार्पण आमदार चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते पार पडले. यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, मुक्ताईनगर उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, सुधीर कुलकर्णी, शहर प्रमुख सुरज परदेशी, छोटू पाटील, शाम पाटील, प्रवीण पाटील, मनोज येवले, नितिन महाजन, मधुकर कोळी, चंद्रसिंग जाधव, प्रमोद माळी, शिवाजी पाटील, सचिन पाटील, आधार पाटील, अनिल महाजन, विनोद बाहरे, संजय लोणारी, शंकर चौधरी, सुर्यकांत पाटील, रविंद्र कुलकर्णी, चंद्रकांत देशमुख, शुभम चौधरी, अनिकेत पाटील, दीपक चौधरी, शुभम लोणारी, हिमांशु पाटील, मनिष महाजन, सुमीत पाटील, योगेश चौधरी, अथर्व कुलकर्णी, मनिष सापकर, लोकेश,चिमनपुरे, विशाल माळी, नितीन पाटील, सुनील बऱ्हाटे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...