आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोमवारी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, उमा खापरे व प्रसाद लाड विजयी झाल्याबद्दल शहर भाजपने मंगळवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज संकुलाजवळ फटाक्याची आतषबाजी व लाडू वाटप करून जल्लोष केला.
यावेळी पक्षाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या. रस्त्यावरील पादचारी व बस थांबवून प्रवाशांनाही मिठाई वितरण करण्यात आली. यावेळी घोषणाही देण्यात आल्या.
या प्रसंगी माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, जिल्हा चिटणीस शैलेजा पाटील, प्रा.दिनेश राठी, सतीश सपकाळे, अजय नागराणी, शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, गिरीश पाटील, बिसन गोहर, जयंत माहुरकर, शिशिर जावळे, अनिल पाटील, विशाल जंगले, प्रशांत देवकर, अनुसूचित जाती मोर्चाचे धनराज बाविस्कर, अलका शेळके, महिला मोर्चाच्या अध्यक्ष अनिता आंबेकर, बेटी बचाव अभियानाच्या अध्यक्ष भारती वैष्णव, गिरीश महाजन, मुकेश पाटील, गुणवंत बोरोले, मंगेश पाटील, युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, ओबीसी मोर्चाचे भावेश चौधरी, किरण मिस्त्री, अनु.जाती मोर्चा शहराध्यक्ष राहुल तायडे, शंकर शेळके, शेखर धांडे, मुकेश पाटील, गुणवंत बोरोले, प्रा.विलास अवचार, संजय बोचरे, व्यापारी आघाडीचे सागर चौधरी, चेतन सावकारे, गोपीसिंग राजपूत, लखन रणधीर, ईश्वर पवार, विजय पवार, पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.