आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकल वॉर्मिंग:‘दीपनगर’च्या चिमणीतील फ्लू गॅसेस, कूलिंग टॉवरमधून बाहेर पडणाऱ्या उष्णतेमुळे भुसावळ शहर सर्वाधिक उष्ण; तापी नदीचे खडकाळ पात्र, विस्तीर्ण रेल्वेचे यार्ड, चौपदरीकरणात झालेली वृक्षतोडही कारणीभूत

भुसावळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर महाराष्ट्रात यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४४.३ अंश तापमानाची नोंद भुसावळात झाली. संपूर्ण राज्यात उन्हाची तीव्रता अधिक आहे. मात्र इतर शहरांच्या तुलनेत भुसावळचे तापमान सरासरी एक ते दीड अंश जास्त आहे. हा ग्लोबल सोबतच ‘लोकल वार्मिंग’चा परिणाम आहे. दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राच्या चिमणीतून निघणारे फ्लू गॅसेस, कुलिंग टॉवरमधून बाहेर पडणाऱ्या उष्णता तसेच तापी नदीचे विस्तीर्ण खडकाळ पात्र, रेल्वेचे यार्ड व महामार्ग चौपदरीकरणात झालेली वृक्षतोडीमुळे इतरांच्या तुलनेत भुसावळात एक ते दीड अंश तापमान जास्त असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

१७ मे २०१६ मध्ये ४८ अंशांचे रेकॉर्ड
भुसावळ शहराचे आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान १७ मे २०१६ रोजी तब्बल ४८ अंश एवढे होते. शहरातील केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयात नोंदवले गेले आहे. मार्च महिन्यात भुसावळ शहराचे सरासरी तापमान चाळिशीच्या आत असते. एप्रिलमध्ये पारा ४१ ते ४३ अंशांदरम्यान तर मे महिन्यात पारा ४३ अंशांच्यावर जाते. यंदा मात्र मार्चमध्ये तापमानाने चाळिशी गाठली. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ते ४४.३ अंशांपर्यंत पोहोचले. त्यामुळे २०१६ च्या उच्चांकी तापमानाचा रेकॉर्ड एप्रिलमध्येच मोडला जाईल काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...