आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापालिकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी प्रांत कार्यालयात आरक्षण सोडत निघाली. त्यात अनुसूचित जातीसाठी प्रभाग क्रमांक १,२,३,४,५,१०, १३ व १९ या आठ प्रभागांत आरक्षण आहे. यातील ३, ४, ५ व १३ या प्रभागातील अ वॉर्डात महिला राखीव आरक्षण निघाले. तर अनुसूचित जमातीच्या प्रभाग ८ व २१ मध्ये ८ अ ही जागा महिला आरक्षित झाली. या सोडतीत मावळते नगरसेवक अॅड.बोधराज चौधरी यांच्या प्रभाग १० मध्ये अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिला असे आरक्षण निघाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या. उर्वरित सर्व मातब्बर सेफ झोनमध्ये आहेत.
प्रांत रामसिंग सुलाणे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात अनुसूचित जाती प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक १०, ३, ४, २, ५, १३, १९ व १ या आठ प्रभागांत आरक्षण आहे. यातील ३, ४, ५ व १३ या प्रभागातील अ वॉर्ड महिला राखीव निघाले. अनुसूचित जातीच्या प्रभाग ८ व २१ मध्ये ८ अ या जागेवर महिला आरक्षण ईश्वर चिठ्ठीच्या मदतीने काढण्यात आले.
शहरातील राजकारणावर परिणाम कसा?
प्रभाग १ : अनुसूचित जाती महिला संवर्गातून लक्ष्मी रमेश मकासरे या भाजपकडून जिंकल्या होत्या. आता ही जागा अनुसूचित महिलांसाठी राखीव झाली नाही. या जागेवर अनुसूचित जाती पुरुष व महिला दोेन्ही निवडणूक लढवू शकतात. यामुळे उमेदवार वाढतील.
प्रभाग १९ : राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांच्या पत्नी मीनाक्षी धांडे येथील नगरसेविका आहेत. ही जागा सर्वसाधारण निघाल्यास नितीन धांडे यांनी तयारी दर्शवली होती. मात्र, आरक्षण सोडतीत १९ अ ची जागा अनुसूचित जाती आणि ब ची जागा सर्वसाधारण महिला असल्याने त्यांना संधी मिळणार नाही. मात्र, मीनाक्षी धांडे उमेदवार असू शकतात.
प्रभाग २१ : नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांचा बालेकिल्ला आहे. या प्रभागात अनुसूचित जमाती व सर्वसाधारण महिला असे आरक्षण निघाले. ठाकूर यांच्याकडे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र असेल तर ते आरक्षित जागेवरून निवडून लढवू शकतील. त्यांच्या पत्नी सरकारी नोकरीत असल्याने सर्वसाधारण जागेवर त्यांना संधी नसेल.
‘दिव्य मराठी’चा अंदाज तंतोतंत ठरला खरा
‘दिव्य मराठी’ने ११ जूनच्या अंकात ‘८ प्रभागांत अनुसूचित जाती, तर २ प्रभागांत अनुसूचित जमातीचे आरक्षण’ अशी बातमी सर्वप्रथम दिली होती. त्यात नमूद केल्यानुसार आरक्षण निघाल्याने ‘दिव्य मराठी’चे हे वृत्त तंतोतंत खरे ठरले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.