आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलसाठा:भुसावळकरांसाठी मिळेल हतनूर‎ धरणातून आवर्तन, मागणी नोंदवली‎

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ‎ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ‎पालिकेच्या बंधाऱ्यात सध्या ‎आठवडाभर पुरेल इतका जलसाठा शिल्लक आहे. यामुळे हतनूर‎ धरणातून आवर्तन मिळणार आहे. याबाबत पलिकेने मागणी नोंदवली असून बंधाऱ्यातील जलसाठा ‎संपण्यापूर्वी हतनूर धरणातून‎ आवर्तन मिळणार आहे.‎ शहराला तसेच रेल्वेच्या वसाहतीसाठी तापीपात्रातील‎ बंधाऱ्यात जलसाठा केला जातो. ‎पावसाळ्यानंतर साधारण जानेवारी ‎ ‎ महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ‎पाण्याची गरज भासते. सध्या शहर ‎आणि रेल्वेला पाणीपुरवठा‎ करणाऱ्या बंधाऱ्यात सात दिवसांचा ‎ ‎ जलसाठा शिल्लक आहे. यंदा‎ परतीच्या पावसामुळे उशिरापर्यंत‎ आवक कायम राहिली. यामुळे‎ तापीतील बंधाऱ्यात जलसाठा‎ असल्याने आवर्तनाची गरज‎ भासली नाही. गेल्या पंधरवड्यातही‎ हतनूर धरणातून ५० क्सुसेस‎ अतिरिक्त पाणी सोडण्यात आले‎ होते.

यामुळे सध्या किमान सात‎ दिवस पुरेल इतका जलसाठा‎ शिल्लक आहे. यामुळे पालिकेने‎ हतनूर धरणाकडे मागणी नोंदवली‎ आहे. या आठवडाभरात हतनूर‎ धरणातून आवर्तन मिळेल, अशी‎ शक्यता वर्तवली जात आहे.‎ त्यामुळे टंचाईचे संकट दूर होईल.‎तापी पात्रातील बंधाऱ्याची पातळी अशी खालावली आहे.बंधाऱ्यातील साठा संपण्यापुर्वी मिळेल आवर्तन‎ सात दिवस पुरेल इतका जलसाठा शिल्लक असला तरी तो संपण्यापुर्वी‎ हतनूरचे आवर्तन मिळेल, यामुळे कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण‎ होणार नाही. हतनूर धरणात यंदा अधिक जलसाठा आहे, यामुळे‎ उन्हाळ्यातही पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होणार नाही.‎ सतीश देशमुख, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, भुसावळ पालिका‎ बंधाऱ्यातील साठा संपण्यापुर्वी मिळेल आवर्तन‎ सात दिवस पुरेल इतका जलसाठा शिल्लक असला तरी तो संपण्यापुर्वी‎ हतनूरचे आवर्तन मिळेल, यामुळे कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण‎ होणार नाही. हतनूर धरणात यंदा अधिक जलसाठा आहे, यामुळे‎ उन्हाळ्यातही पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होणार नाही.‎ सतीश देशमुख, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, भुसावळ पालिका‎

बातम्या आणखी आहेत...