आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना बंड:भुसावळचे अनिल चौधरी बच्चू कडूंसोबत गुवाहाटीत दाखल

भुसावळएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे नाराज व बंड पुकारणारे आमदार मुंबईतून सुरत व तेथून थेट गुवाहाटीत दाखल झाले. अनेकांकडे तर वापरासाठी कपडे देखील नव्हते. मात्र, गुवाहाटीच्या हॉटेलात टूथ ब्रशपासून कपड्यांपर्यंत सर्व व्यवस्था केली आहे. बाहेर जाण्यास मात्र कोणालाही परवानगी नाही. प्रत्येक आमदार व सोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांना हॉटेलात स्वतंत्र रुम दिल्या आहेत. त्या ठिकाणी गरजेच्या सर्व वस्तू आहेत. कोणत्याही आमदारांवर जबरदस्ती नाही, अशी माहिती गुवाहाटीतील ‘हॉटेल रेडिसन ब्लू’मध्ये आमदारांसोबत असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी दिव्य मराठीला दिली.