आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आग्रही‎:फैजपूर शहरात स्वच्छतेसाठी‎ भाजप ओबीसी मोर्चा आग्रही‎

फैजपूर‎5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फैजपूर शहरात अस्वच्छता वाढली आहे. ‎कॉलनी परिसरात अनेक ठिकाणे डासांची उत्पत्ती स्थळे आहेत. यामुळे डेंग्यूसोबतच ‎हिवताप अन्य रोग पसरण्याची शक्यता‎ आहे. पालिकेने तातडीने स्वच्छता‎ अभियान राबवावे, या मागणीसाठी भाजप ‎ओबीसी मोर्चाने मुख्याधिकारी वैभव लोंढे ‎यांना निवेदन दिले.‎ या निवेदनाची दखल घेत पालिका‎ कर्मचाऱ्यांना स्वच्छता, फवारणीच्या‎ सूचना दिल्याची माहिती मुख्याधिकारी‎ वैभव लोंढे यांनी दिली. शहरातील युनियन‎ बँकेतील प्रिंटर अनेक दिवसांपासून बंद‎ आहे. यामुळे खातेधारकाचे पुस्तक भरणा,‎ नोंदी घेण्यास मोठे त्रासदायक ठरते.

सदर‎ सुविधा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी‎ व्यवस्थापकांकडे केली. याप्रसंगी ओबीसी‎ मोर्चा प्रदेश सचिव भरत महाजन, जिल्हा‎ उपाध्यक्ष नीलेश कोल्हे, सचिव अतुल‎ महाजन, हरचंद वाघुळदे, युवराज चौधरी,‎ शहराध्यक्षा अनुराधा परदेशी, उपाध्यक्ष‎ भारती पाटील आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...