आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाणिज्य विभाग:रेल्वे तिकिटांचा काळा बाजार, संशयावरून एकाला पकडले

भुसावळ13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वेच्या वाणिज्य विभागाने सोमवारी जळगाव रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीजवळ अचानक तपासणी केली. त्यात एका संशयित व्यक्तीजवळ तीन आरक्षित तिकिटे आणि रोख ११ हजार ४६० रुपये आढळले. यानंतर आरपीएफ व तिकीट निरीक्षकांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले.

जळगाव रेल्वे स्थानकावरील आरक्षण तिकीट खिडकीवर रांगेत उभ्या प्रवाशांची अचानक तपासणी झाली. त्यात गणेश प्रकाश नारखेडे (रा.असाेदा भादली, ता.जळगाव) यांना तिकिटाच्या काळ्या बाजाराच्या संशयावरून तिकीट निरीक्षक व अारपीएफने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे ३ आरक्षित तिकिटे आणि रोख रक्कम सापडली. सीटीअाय वाय.डी.पाठक, ए.एस.राजपूत, जी.एन.भांडारकर यांनी अारपीएफ निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील यांच्या सहकार्याने रेल्वे अॅक्टनुसार ही कारवाई केली. सण उत्सवाच्या काळात होणारी प्रवाशांची गर्दी पाहता कोणतेही स्थानक, तिकीट खिडकीवर या पद्धतीने अचानक तपासणी होईल असे विभागाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...