आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या निवास्थानावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद शुक्रवारी शहरातही उमटले. राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वात सायंकाळी जामनेरोडवरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राजवळ, तब्बल अर्धातास रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलामुळे अर्धातास जामनेररोडवरील वाहतूक ठप्प झाली. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी आंदोलकांची भेट घेवून निवेदन स्विकारले. रस्तारोकोतील १५ आंदोलकांना अटक करुन सुटका करण्यात आली.
शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी आंदोलनाच्या नावाखाली दगडफेक, चप्पलफेक केल्याची घटना घडली. यामुळे युवक राष्ट्रवादी काँग्रेसने जामनेररोडवरील साईबाबा मंदिराच्या परिसरात रस्ता रोको आंदोलन केले. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे व तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.
या प्रकरणी आंदोलनकांना अटक करुन सुटका करण्यात आली. आंदोलकांनी पोलिसांना निवेदन देवून कारवाईची मागणी केली. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य करुन शरद पवार यांना १२ तारखेला बारामतीत येऊन दाखवा अशी धमकी दिली. परिणामी समाजकंटकांनी विरोधी पक्षाच्या लोकांनी एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी दिली. यामुळे पवारांच्या घरावर हल्ला झाला. हा न्यायालयाचा अवमान असल्याचे नमूद केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.