आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉर्ट टर्मिनेट:भादलीजवळ ब्लॉकने सोमवार; मंगळवारी 18 प्रवासी गाड्या रद्द

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ विभागातील भादली रेल्वे स्थानकावर चौथ्या रेल्वे लाइनचे काम सुरू आहे. त्यासाठी ७ व ८ नाेव्हेंबर रोजी १८ रेल्वे गाड्या रद्द असतील. तर ९ गाड्या विभागातील वेगवेगळ्या स्थानकांवर थांबवल्या जातील. दुसरीकडे नागपूर विभागात देखील ब्लाॅक घेतल्याने विदर्भ व महाराष्ट्र एक्स्प्रेस नागपूरला शॉर्ट टर्मिनेट केल्या आहे.

ब्लाॅकच्या काळात ९ गाड्यांना विविध रेल्वे स्थानकांवर थांबवण्यात येईल. त्यात अमृतसर-मुंबई ही गाडी ७ रोजी दुपारी ४.४५ ते ५.४५ पर्यंत भुसावळ, हटिया-पुणे गाडी ७ रोजी भुसावळला सायंकाळी ५ ते ५.५० थांबेल, गाेरखपूर-एलटीटी सोमवारी भुसावळला सायंकाळी ५ ते ५.५५, जयनगर-एलटीटी गाडी ७ रोजी सायंकाळी ५ ते ५.४० या वेळेत दुसखेडा, गाेंदिया-काेल्हापूर गाडी ७ रोजी सायंकाळी ५.१५ ते ५.५५ या वेळेत वरणगाव, बंगळुरू-दिल्ली ही गाडी ७ रोजी सायंकाळी ५ ते ५.४० या वेळात जळगाव थांबेल.

या गाड्यांच्या मार्गात केला आहे बदल
हावडा-मुंबई दुरंतो एक्स्प्रेस ७ ते ९ नोव्हेंबर काळात कटनी, जबलपूर, इटारसी, खंडवा, भुसावळ मार्गे धावेल. मुंबई-हावडा दुरंताे एक्स्प्रेस ६ ते ८ या काळात भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनीमार्गे धावेल. पुणे-हावडा दुरंताे एक्स्प्रेस ७ रोजी भुसावळ, कटनी, जबलपूर मार्गे जाईल. शालिमार-एलटीटी एक्स्प्रेस ही गाडी ६ ते ८ नाेव्हेंबरदरम्यान कटनी, जबलपूर, इटारसी, खंडवा, भुसावळमार्गे जाईल. एलटीटी-शालिमार एक्स्प्रेस ६ ते ८ नाेव्हेंबरदरम्यान भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी मार्गे धावेल.

या गाड्या झाल्या रद्द
दाेन दिवस रद्द असलेल्या गाड्यांमध्ये भुसावळ-इगतपुरी, इगतपुरी-भुसावळ (दि.८), भुसावळ-देवळाली, देवळाली-भुसावळ (दि.८), सूरत-भुसावळ (दि.७), भुसावळ-सूरत (दि.८), सूरत-भुसावळ (दि.८), भुसावळ-सूरत पॅसेंजर (दि.८), नंदूरबार-भुसावळ, भुसावळ-नंदूरबार, भुसावळ-कटनी या गाड्या मंगळवारी (दि.८) रद्द आहे. कटनी-भुसावळ (दि.९), अमरावती-मुंबई एक्स्प्रेस (दि.७), मुंबई-अमरावती, पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस व भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस, नागपूर-पुणे या गाड्या मंगळवारी तर पुणे-नागपूर एक्स्प्रेस ही गाडी बुधवारी रद्द आहे.

नागपूर विभागात गाड्या शाॅर्ट टर्मिनेट : नागपूर विभागातील ब्लॉकमुळे तीन दिवस गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या आहेत. त्यात मुंबई-गाेंदिया विदर्भ एक्स्प्रेस ६ ते ८ नाेव्हेंबरदरम्यान नागपूरलाच थांबवण्यात येईल. गाेंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस ६ ते ८ नाेव्हेंबर या काळात नागपूर येथून सुटेल. काेल्हापूर-गाेंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस ६ ते ८ नाेव्हेंबर या काळात शाॅर्ट टर्मिनेट असेल.

बातम्या आणखी आहेत...