आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धेचे आयोजन:बोदवडला थाळीफेक, धावणे, बॅडमिंटन स्पर्धा

बोदवड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील बोदवड महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त थाळीफेक, गोळाफेक धावणे व लांब उडी, बॅडमिंटन व बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन केले होते. सुरुवातीला हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. एम. डी. वराडे यांच्याहस्ते झाले. क्रीडा समितीचे प्रभारी क्रीडा संचालक व उपप्राचार्य डॉ. व्ही. पी चौधरी, कमिटी सदस्य डॉ. रुपेश मोरे, डॉ. गीता पाटील, योगेश राजपूत, राजू मापारी उपस्थित होते.

नंतर डॉ.पी.एस.महाले, डॉ.आर.एल. जवरस यांनी स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवली. बॉलबॅडमिंटनमध्ये माजी विद्यार्थी संघ विजयी झाला. अॅथलेटिकमध्ये २०० मीटर मुलांच्या धावणे प्रकारात अजय देवरे, ४०० मीटर धावणे प्रकारात गौरव पाटील, गोळाफेकमध्ये राम पाटील, थाळीफेकमध्ये अजय कदम व सुमित गुरुचळ, लांबउडीत संजय पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

बातम्या आणखी आहेत...