आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्साह:बोदवडला पोलिसांचा डीजेच्या तालावर ठेका

बाेदवड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात एकूण सार्वजनिक ३२ गणेश मंडळांनी यंदा नोंदणी केली होती. त्यापैकी बोदवड शहरात १५ व ग्रामीण भागातील १७ अशा एकूण ३२ मंडळांचा समावेश हाेता. अनंत चतुर्दशी दिनी या सर्व गणेश मंडळांनी मोठ्या उत्साहाने विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदवला. रात्री १० वाजेपर्यंत सर्व गणरायांचे विसर्जन शांततेत पार पडले. मुक्ताईनगर येथील पूर्णा नदीच्या पात्रात श्रींचे विसर्जन करण्यात आले.

घरोघरी स्थापन झालेल्या श्रींच्या मूर्तींचे अनेक ठिकाणी घरच्या घरी व सार्वजनिक मंडळांसाेबत गणपती देऊन विसर्जन करण्यात आले. तालुक्यातील सहा गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’संकल्पना राबवण्यात आली हाेती. पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये व डीजेच्या तालावर मिरवणुका निघाल्या. यावेळी भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

या उत्साहात डीजेच्या तालावर ठेका धरण्याचा मोह बोदवडचे पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक या अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचाऱ्यांनाही आवरता आला नाही. त्यांनीही डीजेच्या तालावर ठेका धरला. यावेळी अनेक ठिकाणी गुलाल व फुलांच्या पाकळ्यांची उधळण करण्यात आली. निर्माल्य संकलनही करण्यात येत होते. रात्री १० वाजेपर्यंत सर्व गणपतींचे उत्साहात विसर्जन झाले. २ पोलिस अधिकारी, २८ पोलिस कर्मचारी व ४० होमगार्ड यांनी मिरवणुकीदरम्यान चाेख बंदाेबस्त ठेवला.

बातम्या आणखी आहेत...