आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनस्ताप:बोदवडला रेशन दुकानदारांना डोकेदुखी, धान्य असूनही वाटपात अडचणी

बोदवड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी बुधवारी तहसीलदार श्वेता संचेती यांची भेट घेत निवेदन दिले. त्यात ई-पॉस मशीनमधील तांत्रिक अडचणींमुळे कार्डधारकांना धान्य वाटप करताना डोकेदुखी होते. ही समस्या तातडीने सोडवावी अशी मागणी केली.

निवेदनात १ ऑगस्टपासून मशीनमधील तांत्रिक व सर्व्हरच्या अडचणींमुळे स्वस्त धान्य दुकानदार त्रस्त आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून लाभार्थींना धान्य वाटप करण्यास असमर्थ ठरत आहे. संपूर्ण तालुक्यात धान्य वाटप बंद पडली आहे. स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्य उपलब्ध आहे, पण मशीनला ऑनलाईन माल उपलब्ध होण्यास अडचणी येत आहेत. जो जुना माल उपलब्ध असल्याचे मशिनमध्ये दर्शवले जाते, तो देखील दिलेल्या वेळेवर वाटप होऊ शकत नाही. परिणामी लाभार्थी दररोज रेशन दुकानांसमोर रांगा लावून उभे असतात. त्यांना उत्तरे देणे दुकानदारांना कठीण झाले आहे. त्यामुळे या समस्या सोडवा अशी मागणी केली. संतोष निकम, बी.एन.पाटील, एम.आर.पाटील, एस.आर.गंगतीरे, आर.एम.पाटील, एम.जी.महाजन अशा १८ जणांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

कार्डधारक नागरिकांचा वाढतो रोष
एकीकडे रेशन दुकानात धान्य साठा असूनही ई-पॉस मशिनमधील तांत्रिक दोषांमुळे तो कार्ड धारकांना वाटप करता येत नाही. दुसरीकडे धान्य मिळत नसल्याने कार्ड धारक मात्र वेगवेगळ्या शंका उपस्थित करतात. रेशन दुकानदार या सर्वांच्या प्रश्नांना उत्तरे देताना चांगलेच त्रस्त झाले आहेत. ही समस्या देखील त्यांनी निवेदनातून मांडली.

बातम्या आणखी आहेत...