आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसोय:लोणवाडीतील दोन्ही बसेस बंद;  विद्यार्थ्यांचे हाल

जामठीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लोणवाडी (ता.बोदवड) येथील लोणवाडी-भुसावळ व मुक्ताईनगर-लिहा या दोन्ही बसेस पूर्ववत सुरू कराव्या, अशी मागणी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी केली आहे. लोणवाडीतील विद्यार्थी जामठी येथील चि.स.महाजन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षणासाठी ये-जा करतात. त्यांच्यासाठी मानव विकास योजनेंतर्गत विशेष बस सोडण्यात येत होत्या. कोरोना काळात बंद झालेल्या या बसेस अजून सुरू झालेल्या नाहीत.

कोरोना लॉकडाउनमध्ये या दोन्ही बसेस बंद करण्यात आल्या होत्या. आता शाळा, महाविद्यालये नियमित सुरू झाले आहेत. कोणतेही निर्बंध देखील नाहीत. तरीही विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या दोन्ही बसेस अद्यापही बंद आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पायी प्रवास करून जामठी येथे शिक्षणासाठी जावे लागते. लोणवाडी-भुसावळ ही बस रात्री ८.३० वाजता मुक्कामी लोणवाडी येथे राहत होती. तर मुक्ताईनगर-लिहा ही बस दुपारी २ वाजता येत होती. त्यामुळे शाळेत ये-जा करणे सोयीचे व्हायचे. आता बसेस बंद असल्याने गैरसोय होत असल्याचे ग्रामपंचायतीने परिवहन मंडळाला कळवले आहे. त्यांनी प्रतिसाद दिल्यास ही समस्या सुटेल.

बातम्या आणखी आहेत...