आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून प्रकरण:कोपरेकर खूनप्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिस कोठडी ; बाजारपेठ पोलिसांनी केली अटक

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील रामदेव बाबा नगरातील रोहित दिलीप कोपरेकर (वय २२) याच्या खून प्रकरणी सागर दगडू पाटील (वय २२,रा. भुसावळ) आणि राहुल राजेश नेहेते (वय १९, रा. पाटील मळा, भुसावळ) यांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली होती. या आरोपींना न्यायालयाने साेमवारपर्यंत (दि.१३) पोलिस कोठडी दिली. अद्याप खुनाचे ठोस कारण समोर आलेले नसले तरी पार्टीतील वादानंतर दोघांनी रोहितची हत्या केल्याची प्राथमिक माहिती दिली आहे. वांजोळा रोडवरील गंगानगर पाठीमागील गोपाळ सावळे यांच्या शेतात रोहितचा कुजलेला मृतदेह आढळला होता. मात्र, पँट व चप्पलेवरून पोलिसांनी ओळख पटवली होती. दरम्यान, वांजोळा रोडवरील हॉटेल गब्बरमध्ये रोहीत व संशयित दोघे पार्टी करताना आढळले होते. यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यापैकी सागरला डोंबिवली, तर राहूलला भुसावळातील नाहाटा चौफुलीजवळून अटक करण्यात आली. पार्टी झाल्यानंतर वाद उफाळल्याने दोघांनी रोहितला आधी गळफास दिला, नंतर डोक्यात दगड टाकून त्याची हत्या केल्याची कबुली दिली आहे. मात्र, पोलिसांकडून या खुनाचे खरे कारण शोधणे सुरू आहे. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, एपीआय मंगेश गोटला तपास करत आहे. या घटनेचा बारका‌ईने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...