आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाला सुरूवात:रिंगरोडसाठी कमल नाल्यावर होणार पूल

भुसावळ15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात यावल नाक्यापासून ते जळगाव रोडवरील लाेणारी हॉलजवळ निघणारा रिंगरोड अर्धवट आहे. या कामाला यावल राेडकडील बाजूने सुरूवात झाली आहे. त्यात कमल गणपती हॉलजवळील नाल्यावर लवकरच पुलाची निर्मिती होणार आहे.शहरातील रिंग रोडच्या कामाला पंधरवड्यापूर्वी यावल रोडवरून सुरूवात झाली आहे. यावल रोडपासून सुमारे ४०० मीटर अंतराचे हे काम सार्वजनिक बांधकामकडून सुरू आहे. त्यात कमल गणपती हॉलजवळील नाल्यावर पुलाची उभारणी सुरू होईल, असे शाखा अभियंता रवींद्र बाविस्कर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...