आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किक बॉक्सिंग:किनगाव स्कूलच्या खेळाडूंची चमकदार‎ कामगिरी; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड‎

यावलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार येथे झालेल्या विभागीय‎ किक बॉक्सिंग स्पर्धेत इंग्लिश‎ मीडियम निवासी पब्लिक स्कूल ‎किनगावचे विद्यार्थी सविन बारेला व ‎ रोशन बारेला यांनी प्रथम क्रमांक ‎ ‎ मिळवला.‎ १४ वर्षाआतील ३२ किलो वजनी ‎गटात सविन सुरेश बारेला, तर १७ ‎वर्षाआतील ४५ किलो वजनगटात ‎राेशन रमेश बारेला यांनी प्रथम‎ क्रमांक पटकावला. या दाेनही‎ खेळाडुंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी‎ निवड झाली आहे. आता ते राज्य‎ स्पर्धा खेळणार आहेत. तसेच‎ मुलींमध्ये अश्विनी शिवाजी बारेला‎ १४ वर्षा आतील २४ किलो‎ वजनगटात तर माना सतरसिंग‎ बारेला हिने ३१ किलो वजनगटात‎ द्वितीय क्रमांक पटकावला. या सर्व‎ खेळाजडुंना कोच तुषार जाधव व‎ क्रीडा शिक्षक दिलीप बिहारी संगेले‎ यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी सर्व‎ खेळाडूंचे किनगाव इंग्लिश मीडियम‎ निवासी पब्लिक स्कूलचे चेअरमन‎ विजयकुमार पाटील, सचिव मनीष‎ पाटील, व्यवस्थापक पूनम पाटील,‎ प्राचार्य अशोक पाटील, उपप्राचार्य‎ राजश्री अहिरराव यांच्यासह शिक्षक‎ आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी‎ कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी‎ मार्गदर्शन केले.‎

बातम्या आणखी आहेत...