आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील बाबा नगर भागात सोमवारी मध्यरात्रीनंतर दोन किराणा दुकानांसह दोन घरांमध्ये चोरी झाली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. घटनास्थळी जळगाव येथून डॉगस्क्वॉड बोलावण्यात आला होला. दोन घरांमधून सुमारे २५ हजारांचे मोबाईल तर दोन्ही दुकानांमधून सुमारे ६० हजारांचा मुद्देमाल लांबवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले तर एक जण फरार झाला. पाेलिसांनी काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
शहरातील विरार नगर भागातील रहिवासी रफिक पटेल यांचे तसेच गनी पटेल यांचेही किराणा दुकान आहे. सोमवारी रात्री दुकाने बंद करून ते दाेघे घरी निघून गेले. मंगळवारी सकाळी जेव्हा ते दुकानावर आले तेव्हा चोरी झाल्याचे निदर्शनास आले. गनी पटेल यांच्या दुकानातून ८ हजारांचा किराणा माल व सुमारे ५ हजारांची रोकड असा १३ हजारांचा मुद्देमाल लांबवला. तर शेख अस्लम शेख अयुब यांच्या घरातून ५ हजार रूपये किमतीचा मोबाईल लांबवला. तर रफीक शफी पटेल यांच्या किराणा दुकानातून ३१ हजार रुपये रोख व अन्य मिळून ४७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. त्यांच्या दुकानांलगत रहिवासी सईद रशीद तडवी यांच्या घरातून २० हजार रूपये किमतीचे दोन मोबाईल चोरीस गेले. चाेरीच्या घटनांची माहिती मिळताच येथील पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक आशित कांबळे, पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर दाखल घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा केला. या प्रकरणी रफिक पटेल यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार बालक बाऱ्हे करत आहे. एकाच रात्री चार ठिकाणी चोऱ्या झाल्याने भीती पसरली आहे.
एकास मुद्देमालासह घेतले ताब्यात, एक फरार या चोरीच्या घटनेनंतर शहरातून आसिफ शेख शमशोद्दीन या तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले. तर दुसरा संशयित फरदीन पटेल हा मात्र पोलिसांना पाहून फरार झाला. आसिफकडून चोरी झाल्यापैकी काही मुद्देमाल आयेशानगरच्या पुढील नवीन प्लॉट भागातून ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच फरार फरदीन पटेलचा पोलिस शोध घेत आहे. दरम्यान जळगाव येथून श्वान पथक बोलावण्यात आले होते. श्वानाच्या मदतीने पोलिस कर्मचारी संदीप परदेशी, विनोद चव्हाण, दर्शन बोरसे यांनी चोरटे कोणत्या दिशेने गेले याची माहिती जाणून घेतली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.